Tuesday, June 30, 2020

जन्मदिन विशेष


जन्मदिन विशेष

|| श्री ज्ञानेश्वर माऊली समर्थ ||

 

·       जन्मदिन विशेष - ( आषाढ शुद्ध  १०)


मानस - आयुर्वेदाचार्य संत श्री गुलाबराव महाराज



                            तुझ्या निश्वासात

                            प्रेमाचीच गंगा

                            म्हणूनिया उभा संसारात !!

                         - बाबाजी महाराज

 

आपल्या संस्कृतीला नेहमी जपून ठेवणारे व त्यातील गुढ समजून सांगणारे भारतीय संत आपल्याला लाभले म्हणूनच आज आपण पण या संसार रुपी सागराला संतांनी सुचवलेल्या भक्ती रुपी नावे ने पार करू शकतो. सर्व जनमाणसांना तारणारे, व भगवंताचा अनध्यस्थविवर्त रुपाची ओळख करून देणारे केवळ आपले संत साहित्य अशा सर्व संतांना शतशः नमन!! विविध संतांनी विविध विषयावर मार्गदर्शन केलेले त्यांच्या साहित्यात दिसून येते, परंतु केवळ एकाच संताने सर्व प्रकारच्या विषयांवर केलेले मार्गदर्शन बघायचे असल्यास लगेच ज्ञानेश्वर माउलींची आठवण येते. कैवल्याचा पुतळा म्हणून आपण ज्ञानेश्वरांचा उल्लेख करतो. माऊली प्रमाणेच सर्व विषयाला स्पर्श करणारे अमृत भांडार पुन्हा सर्वांसाठी खुले केले ते ,संपूर्ण जगताची माउली असणाऱ्या माऊलीच्या कन्येने,,,

                        म्हणजेच

'संत श्री गुलाबराव महाराजांनी' 


      आपणा सारिखे करिती तात्काळ

नाही काळवेळ तयालागी !

 

महाराष्ट्रातील श्रेष्ठ गुरु-शिष्य परंपरा यापासून कोणीच वंचित नाही. गुरुवर नितांत प्रेम आणि भक्ती या दोन्हींनी सहजच गुरूंचे तंतोतंत विचारांचे आपल्या जीवनात अनुकरण करणे हे खऱ्या शिष्याची लक्षणे,,, असेच शिष्य म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज आणि त्यांच्या ओतप्रोत भक्तीनेच साक्षात माऊलींनी त्यांना स्व नामाचा अनुग्रह दिला तेव्हापासून ते स्वतःला 'ज्ञानेश्वर कन्या' असेच म्हणत. ही संपूर्ण जगताची माउली कशी दिसते याचे पहिले चित्र महाराजांनी एका चित्रकारांकडून काढून जगासमोर आणले. श्रीमहाराज केवळ माऊलींची कन्या म्हणत नसत तर ते त्यांची कन्या शोभून दिसतात कारण जशी माऊली तसे महाराज, साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या कन्येचा मान मिळवणाऱ्या या प्रेमळ संताचा आज तिथीनुसार जन्मदिवस. महाराजांचा जन्म विदर्भातील लोणी टाकळी या त्यांच्या आजोळी झाला त्यांचे मूळ गाव माधान परंतु त्यांचे विचार मात्र संपूर्ण विश्वाला पुरून उरणारे. संत कुठल्याही भागातील असो त्यांचे विचार हे संपूर्ण जन् माणसाचा कल्याणासाठी असतात. त्यात श्री महाराजांचे विचार तर प्रत्येकाला एकाच जन्मात वाचणे म्हणजे आश्चर्यच कारण विचारांची व्याप्ती, सखोलता, समन्वयक दृष्टी, शास्त्रांचा आधार, युक्तीने पटवून देण्याची युक्ती हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. केवळ 34 वर्षांच्या आयुष्यात 130 ग्रंथांचा अमूल्य भांडार त्यांनी सर्वांसाठी खुला केला. या 130 ग्रंथांमध्ये सर्व धर्मांचा समन्वय, योग, न्याय, सांख्य-वैशेषिक, विज्ञान,, भक्ती, शिक्षण, संगीत, काव्य, नाट्य, सांकेतिक लघुलिपी, नवीन नावंग भाषेची ची निर्मिती, क्रीडा, मनोविज्ञान, बुवाबाजी, इतिहास, पाश्चात्त्य मतांची समीक्षा, नीतिशास्त्र या सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या ग्रंथसंपदेतील विषय देखील एका लेखात पूर्ण होऊ शकत नाही ,अशी पूर्ण ग्रंथरचना त्यांनी त्यांच्या 34 वर्षात केली, तेही चोख संसार सांभाळून. त्यांचे हे ज्ञान डोळस लाही लाजवणारे आहे.

महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न वादाला प्राधान्य दिले आणि तो प्रयत्न वाद त्यांच्या आयुष्यातून आदर्श म्हणून जगापुढे मांडला, तो कसा ?  तर नऊ महिन्यांची असताना डोळे आले व चुकीच्या उपचारांमुळे ते कायमचे गेले. चर्म चक्षुतील तेज नाहीसे झाले, तरी त्यांची जागा प्रज्ञाचक्षू नी घ्यावी यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नरत होते, त्यांची भक्ती, विश्वास , ग्रंथ विषयी प्रेम, ते वाचून घेण्याची तळमळ सर्व शास्त्रांचा आधार घेऊन चुकीचं ते खोडून बरोबर ते आपल्यासमोर ठेवून आजन्म त्यांचे स्पष्ट विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे प्रयत्न व तळमळ त्यांच्या साहित्य अलंकार यातून स्पष्ट दिसते. आज आपण छोट्या गोष्टींना कंटाळून प्रयत्न करणे सोडून देतो तेव्हा श्रीमहाराजांचे जगत कल्याणाचे हे प्रयत्नवादी विचार च नव्हे तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच आपल्या सर्वांना आदर्श आहेत, असा एकही विषय नाही ज्यावर महाराजांनी त्यांचा परिस स्पर्श करून प्रकाश टाकला नाही. प्रत्येक विचार शास्त्रोक्त पद्धतीने ने मांडणारे महाराज त्यांच्या साहित्यात आरोग्य विषयाला स्थान देणार नाही हे कसे शक्य आहे? चरक संहितेत पासून ते पाश्चात्य धन्वंतरी पर्यंत च्या विविध मतांचा आढावा घेत ते आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात यावरून त्यांची आयुर्वेदावरील सखोल ज्ञानाची प्रचिती येते.

'धर्मार्थकाममोक्षाणामारोग्यं मूलकारणम् । 'सर्वमन्यत्परित्यज्य शरीरमनुपालयेत् । तभावे हि भावानां सर्वा भावः शरीरिणाम् ।।'

-चरकसंहिता

धर्म अर्थ काम तसेच मोक्षाच्या प्राप्तीचे साधन शरीरच आहे.

महाराजांनी प्राचीन आर्यांच्या वैद्यकशास्त्रातून विखुलेले मानसायुर्वेदाचे विचार नव्या रीतीने मांडून अॅलोपॅथीच्या जंतुकारणवादावर आघात केला आहे पण त्याचबरोबर शल्यचिकित्सा प्रत्यक्ष असल्याने तिचा स्वीकारही केला आहे. महाराजांची आयुर्वेदावरील ही ग्रंथरचना केवळ रोग बरे करण्यासाठी नसून पामर विषयी मुमुक्ष आणि सिद्ध या सर्वांना स्वास्थ्य लाभावे यासाठी आहे. केवळ परमार्थासाठी देखील निरोगी शरीर आणि स्वस्थ मन याची आवश्यकता असतेच त्यामुळे त्यासाठी आहार कसा असावा याबद्दल ते प्रथम सांगतात.

आहारं च विहारं च राजसं तामसं त्यजेत् ।सात्विकं सुखदं शुद्धं सेवेत प्रियभाषितम् ।।

जर तुम्ही सात्विक आहार घ्याल तरच आरोग्य चांगले राहील त्यांनी मांसाहाराचा प्रखरतेने निषेध केला आहे. अन्नाचे प्रकृतीनुसार शरीरावर होणारे परिणाम सांगतांना ते म्हणतात, "अन्नाचा सात्विक भाग तें मन । राजस भाग ते वीर्यादि जाण । तामस भाग तें मांस पूर्ण । ते भक्षितां तमोगुण अधिक वाढे ।। यद्यपि जड अन्न तामस । तथापि त्यांतोनि लीन सात्विकभाग मिळे चित्तास। जड अन्नातील तमपरिणाम मांस । येणे तामस गुण वाढे ।। अशाप्रकारे जर मांसाहार  घेतला तर तामस गुण वाढीस लागून जीव हिंसेची मानसिकता होण्यास वेळ लागत नाही.  'गाईचे शुद्ध दूध, तूप, ताक व दही यांचा वापर आहारात असावा. आमच्या पाश्चात्य भ्रातृवर्गालाही ताकाचे महत्व चांगले कळू लागले. ताकाने म्हातारपण येत नाही असे असून, त्यांचे लेख आंग्ल वैद्य मासिक पुस्तकांतून चमकत आहेत. गाईच्या तुपाचा तर आरोग्य स्थितीत व रोगी स्थितीत सारखाच उपयोग होतो, तसेच क्षय, संग्रहणी वगैरे रोगांवर पंचगव्याचा उपयोग होतो. असे महाराज म्हणतात आणि गाईच्या मांसाचे सेवन ज्यावेळी सुरू झाले, त्यावेळी सर्वांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले, याबाबत सांगतांना ते म्हणतात, एका पृषध्र राजाने दीर्घकालपर्यंत एक यज्ञ केला. त्यात पशू न सांपडल्यामुळे त्याने गाईचा वध करण्यास आरंभ केला. गाईचे मांस अतिशय जड, अविहित व अयोग्य असल्यामुळे पृषघ्र राजाच्या यज्ञात अतिसाराची उत्पति झाली. तोपर्यंत या पृथ्वीवर अतिसार म्हणून ठाऊक नव्हता.

आणि म्हणूनच “जी गाय आपल्या वासराकडे न पाहाता आम्हा मनुष्यपुत्रांचे स्वतःच्या दुधाने पोषण करिते, त्या धेनुमातेची चरणसेवा करण्यांत आपले आयुष्य सतत उपयोगात आणावे. महाराज म्हणतात, आहार करावयाचा तो नियमानुसार करावा. वाईट,.  कडक असा आहार करू, नये. मधुर, पुष्टिकर व बुद्धिवर्धक असा आहार घ्यावा व तोही पण नियमित म्हणजेच दोन भाग अन्न, एक भाग पाणी इतके ग्रहण करावे व एक भाग वायू खेळण्याकरिता रिकामा ठेवावा. शास्त्रात असेही सांगितले आहे की, संन्याशाने आठ ग्रास घ्यावे. वानप्रस्थाने सोळा घ्यावे. गृहस्थाश्रमी असणाऱ्याने बत्तीस घ्यावेत. योगामध्ये ब्रह्मचर्य साधावे लागते म्हणून येथे आपण चोवीसच ग्रहण करू, याहून योग्याने अधिक भोजन करू नये. हा मिताहार साधला असता सर्व वात, पित्त, कफादि त्याची नाश पावतात व योगाभ्यासाची शक्ती येते. अशाप्रकारे मिताहार चे महत्व महाराज विशद करतात. आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले असून त्यामुळे आपल्यात तीन दोष उत्पन्न झाले आहेत, आकाश व वायू यापासून वातदोष, अग्नीपासून पित्तदोष आणि जर व पृथ्वीपासून कफदोष निर्माण झाला. या तीन दोषांचे जेव्हा परस्पर मिश्रण होते तेव्हा रोग उत्पन्न होतात यापैकी एक जरी बिघडला तर प्रकृती रोगी आहे असे समजावे हे दोष खाण्यामध्ये अपथ्य केल्याने बिघडतात ज्या ऋतूमध्ये जे खायचे किंवा जे कर्म करायचे ते केले असता प्रकृती सदा निरोगी राहते.. प्रकृती निरोगी ठेवून ब्रह्मज्ञान करून घेता यावे यासाठीच चार वेदा नंतर पाचवा आयुर्वेद प्रकट केला आहे हा उपवेद आहे.

या तीन दोषांचे संतुलन बिघडू नये म्हणून कोणते पदार्थ कधी खावे ते सांगताना महाराज म्हणतात, सकाळी ६ वाजल्या पासून १० वाजेपर्यंत कफ असतो म्हणून त्यावेळेला कफ वाढविणारे पदार्थ खाऊ नये,सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत पित्त असते. म्हणून या वेळेला पित्त वाढविणारे पदार्थ खावू नयेत. दुपारी २ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत वात असतो म्हणून या वेळेला वात वाढविणारे पदार्थ खावू नये. पुन्हा ६ पासून १० पर्यंत कफ, १० ते २ पित्त व २ ते ६ वात. याच प्रमाणे  आयुष्यात बालपणी कफ, तारुण्यांत पित्त व वृद्धापकाळी वात अधिक असतो. हवा पाण्यानुसार देशांचे प्रकार महाराजांनी सांगितले आहेत. त्याबाबत ते म्हणतात, "ज्या देशांत पाणी कमी, खडक फार उन फार, झाडे वगैरे कमी तो जांगल प्रदेशात वात जास्त असतो. पाणी जास्त, खडक कमी, उन कमी, झाडे वगैरे फार त्या देशाला अनूप म्हणतात. अनूप देशात कफ जास्त असतो. ज्या देशात झाडे, पाणी, खडक वगैरे साधारण असतात, त्या साधारण देशात पित्त जास्त असते. आपण ज्या देशात जातो त्या देशाप्रमाणे वागावे. त्या देशात जे पदार्थ खावू नये असे असते, ते खाऊ  नयेत.

रोज सेवन योग्य औषधांमध्ये त्रिफळा, सुंठ, सैंधव, निंब, लिंबू,, तुळशी, सोने, आले यांचा सामावेश असावा असे महाराज सांगतात. व्यायामावर देखील ते भर देतात, प्राणायाम विषयी सांगताना ते म्हणतात, मनुष्यप्राण्याच्या शक्ती मधून मधून विश्रांतीची ची अपेक्षा करतात त्यापैकी मनाला तर झोपेत विश्रांती मिळते पण प्राणाला मात्र मुळीच विश्रांती मिळत नाही. प्राणाच्या गती पेक्षा आपण त्याच्याकडून गैरवाजवी काम घेतो तात्पर्य, आपण फाजील व्यायाम करतो परंतु प्राणायामने आतील कुंभका ने ही उणीव भरून निघते व प्राणायाम करून उठलेल्या यांच्या नाडीन ला हुशारी येते. प्राण कोंडून धरण्याची सवय लागली, तर काही रोगात श्वासाचा निरोध झाला असता मनुष्य एकाएकी घाबरत नाही. रोज प्राणायामाच्या वेळी घाम निघून जात असल्यामुळे रोगाचे विष शरीरात बाधू शकत नाही व परमाणु परमाणु ला व्यायाम घडतो त्यामुळे आयुष्य वाढते ही काही ही जादू नव्हे तर शास्त्र आहे, असे महाराज सांगतात.

पूर्वीची  स्वाभाविक सहनशक्ती नाहीशी करून, आपल्याविषयी रोगांची फाजील शंका घेऊन जो औषधांची सवय लावून घेतो त्याला श्रीमहाराज पडत मूर्ख म्हणतात. आरोग्यासाठी अति चिकित्सकता कामाची नाही. बाळंतपणा सारख्या स्वाभाविक स्थितींत रोग मानून उगीच औषधे देत बसतो तो अतिचिकित्सकच. “जो औषधी घेत नाही, जो औषधी घेतो पण पथ्य करीत नाही व जो औषध घेतो, पथ्य करितो, पण मला मोठा रोग झाला आहे असे चिंतन करून नित्य भितो, या तिघांचा रोग साध्य असला तरी राजवैद्याकडूनही दूर होत नाही आणि जो पथ्येने वागतो त्याचा रोग औषध न घेतले तरी वाढत नाही. म. वा. भट वकील आपल्या पत्रात महाराजांना विनंती करतात की हल्ली जुन्या वैद्यकात उतरती कळा लागून जून से नष्टप्राय होत आहे तेव्हा  आपल्यासारख्या अधिकारी पुरुषांनी लोकांपुढे मांडल्यास पुष्कळशी दुराग्रह नाहीसे होतील त्यावरून मी वैद्यवृंदावन नावाचा ग्रंथ लिहीत आहे असे श्री महाराजांनी सांगितले व आयुर्वेदावर आधारित एकूण पाच ग्रंथांची निर्मिती केली.

महाराजांनी आयुर्वेदाचा व अध्यात्माचा ही समन्वय केला आहे, व पाश्चात्य चिकिस्ता शास्त्रावर टीकेचे शस्त्रही उपसले आहे.. , पश्चिमेकडील सृष्टी स्वभावाने रोग दूर करण्या च उपाय योग्य की अयोग्य यावर महाराज म्हणतात, पश्चिमेकडे ते सर्व उपाय पाहिजे आहेतच कारण पाश्चात्य जीवित सर्व विषयी झाले आहे, अस्वाभाविक जनावरांचे मांस, मद्यपान, सर्वदा क्रोध यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक जीवित सर्व ताच विषय झाले आहे म्हणून त्यांना स्वाभाविक चिकित्सा करणे हिताचेच आहे पण हिंदुस्थानने त्या उपायांचे गोडवे गायले पाहिजेच असे नाही कारण हिंदुस्थानातली जीवित एवढे विषयी झालेले नाही म्हणूनच वैद्यकितील औषधे सर्व खाण्यापिण्याच्या पदार्थांची बनलेली आहेत कोणा प्राण्याच्या रक्तातील सत्व काढून किंवा मासातील सत्व काढून बनलेली नाहीत. पाश्चात्य वैद्यकशास्त्रात बहुतेक रोग स्पर्शजन्य मानले आहेत जे महाराजांना अजिबात मान्य नाही ते म्हणतात  "स्पर्शजन्य रोग म्हणून एखाद्यास झाला म्हणजे त्याचे आईबाप, बंधू, बायको, मुले सर्व त्याचा जन्मभराचा प्रेम सारून दूर होतात आणि तोच रोग आपणास होऊ नये म्हणून त्याच रोगाचे विष आपल्या अंगात टोचून घेण्याकरिता दवाखान्यात जातात.

      रोग्याचे मन निरोगी स्थितीत असेल तर वरील चिकित्सा पद्धती योग्य आहे ज्या रोगात शारीरिक परिणाम मनावर प्रथमच होत नाही त्या रोगात रोगाच्या इच्छेनुसार चिकित्सा आपल्याकडेही आहे. परंतु क्षयात स्त्री संगाची इच्छा, संग्रहित सर्व रस खाण्याची इच्छा जर असे रोग्याला वागू दिले तर रोग्याची उद्याच्या ऐवजी आजच बाहेर गावची व्यवस्था करावी लागेल. महाराज म्हणतात," मला तिकडची शस्त्रक्रिया प्रत्यक्ष असल्यामुळे मान्य आहे, पण औषधी क्रिया 'अत्यंत' मान्य नाही. हिंदू ग्रंथाच्याच आधारे लोकांनी स्वाभाविक चिकित्सेचा आश्रय केला आहे. तो तिकडच्या लोकांकरिता व आपल्याकडील पाश्चात्य विद्या दुर्विदग्धांकरता समंजसपणाचाच आहे "

आयुर्वेदात  मन खंबीर असले तर रोग होत नाही हे मुख्य मांडले आहे. पाश्‍चात्य वैद्यकात जंतू कारण वाद म्हणजे जंतू प्रवेशामुळे रोग होतो हे मुख्य मानले आहे परंतु त्यामुळे जवळची नाती सुद्धा दुरावतात व जंतू च्या भीतीमुळे मने कमकुवत होतात. आपल्या आयुर्वेदाने आपण उत्तम अध्ययन करून सांगितलेल्या मार्गाने प्रयत्न करणे हेच आपले कर्तव्य आहे. सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शन असं जे आपल्याला आत्ताचा कोरोना च्या काळात अत्यंत उपयुक्त आहे ते म्हणजे श्री महाराजांनी सांगितलेला मानसोपचार, यात शरीर व मना चा समन्वय महाराज करतात, ते म्हणतात मनच शरिराचे संचालक असल्याने शरीर व मन  हे एक दुसऱ्यांवर अवलंबून आहेत, वायु पित्त कफ हे शरीराची दोष त्याप्रमाणे राजस व तामस हे मानसिक दोष आहेत या दोघांच्या बुद्धीने मानसिक अस्वास्थ्य उत्पन्न होते व त्यामुळे काम, क्रोध, इर्षा, मोह आदी विकार उत्पन्न होतात व दूषित झालेल्य ला चित्ता पासून रोग निर्माण होतात, अशा प्रकारे प्राचीन ग्रंथांची प्रमाणे देऊन मानस आयुर्वेदाची रचना श्री महाराजांनी केली आहे. मनातील विकारच स्थूल रुपाला आले की रोग होतात जसे काम या विकारापासून क्षयरोग होतो. आधुनिक वैज्ञानिकांनी आता हे मान्य केले आहे. अनेक व्याधींवर मी बरा होईल हा  निर्धार अपरिहार्य आहे.

आयुर्वेदातील शारीरिक, मानसिक, स्वाभाविक, आगंतुक या चारही रोगांचा परस्पर संकर आहे, आणि त्यामुळे त्रिदोष वाद मुख्य नसून मनोविकार वादच मुख्य आहे, कारण मनोविकार आतूनच त्रिदोषा ची उत्पत्ती होते, हे सविस्तर पटवून देण्याकरिता अनेक ग्रंथकारांचे दाखले दिले आहेत, माधवनिदान ग्रंथानुसार मनाची विकृती थांबली की, रोग सुद्धा नष्ट होतात. म्हणूनच आयुर्वेदात औषधींची शारीरिक क्रिया कशी होते यापेक्षा जास्त औषधींचा मनावर कसा परिणाम होतो याकडे विशेष लक्ष दिले आहे, मनाचे रजतम नाहीसे करणारे सत् वर्धक प्रभाव आयुर्वेदात आहे असे ऋषींनी देखील पूर्वीच सांगून ठेवले आहे. मनाची शुद्धता ही एकच अशी क्रिया आहे जी सर्व रोगांवर उपयोगी पडते असे आयुर्वेदाचे स्पष्ट म्हणणे आहे. वाग्भट यांनी औत्सुक्य, मोह आणि आरती हे तीन असाध्य व्याधीचे लक्षण सांगितले. त्याचा खुलासा करताना महाराज म्हणतात, "विषयोत्कंठा, कार्याकार्य न समजणे आणि उठता-बसता-निजता कोठेही बरे न वाटणे हेच वरील असाध्य व्याधीचे मुख्य लक्षण आहे, “मला असे निश्चयाने वाटते की प्रत्येक मनुष्याला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा हिस्टेरिया अवश्य असतो. कोणाला आपल्या बायकोचे वेड, तर कोणाला आपल्या मुलाचे वेड, याप्रमाणे हे सर्व जगत् वेड्यांचे हॉस्पिटल आहे, असे भगवान रामकृष्ण म्हणत असत, हे काही खोटे नाही", आणि म्हणूनच थोडे जरी मनाविरुद्ध झाले तरी त्यामुळे डोके दुखते, मग साहजिकच अरति निर्माण होते. जितके मनोविकार अधिक तितके रोगही अधिक. कोणताही रोग होऊ न देणे हे मनाचा खंबीरपणा वरच खरोखर अवलंबून आहे असे महाराज म्हणतात. यासाठी उत्तम काळ, उत्तम स्मृती, सत्यअसत्या ची निवड,  सत्या पासून न ढळणे, इत्यादी सद्गुण मनोविकार यांचे औषध आहे. म्हणूनच जितेंद्रिय, क्रोध रहित, सत्यवादी पुरुषाला वाग्भट रसायन म्हणतात. धर्माचरण आने आणि सत्संग तिने मन शुद्ध आणि खंबीर केले तर रोग दूर राहतात. आणि रोग होण्यापूर्वीच मला रोग होईल या भीतीने रोगाच्या स्वागतासाठी मन तयार होते नंतर रोग शरीरावर परिणाम करतात. आज जेव्हा संपूर्ण जग कोरूना सारख्या महामारी ला लढा देते तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेणे आवश्यक आहे आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली की आपण दुःखी होतो हे आंतरिक दुःख आणि असंतोष हेच मानसिक अस्वस्थच कारण होत आणि शांत मनाशिवाय निरोगी आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही, या मानसिक आरोग्यासाठी सात्विक आचरण आवश्यक आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे त्यासाठी संयम, नियम, ईश्वराची उपासना हेच मनाला शांती देऊ शकते.

        औषध सर्वरोगाणां श्रद्धया हरिसेवनम् श्रद्धेने श्रीहरीची सेवा करणे, भक्ती करणे हेच सर्व रोगांवरील मोठे रामबाण औषध आहे. असे महाराज सर्वात शेवटी  सांगतात. 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण' ही संत उक्ती तर प्रसिद्धच आहे. आपलं आयुर्वेद व महाराजांनी सांगितलेल मानस आयुर्वेद व महाराजांचे एकूण सर्वच विचार हे  जणू माऊलींच्या मागणीला प्रसन्न होऊन विश्वात्मक देवाने ज्ञानेश्वर कन्येचा रूपात विश्वाला दिलेले एक अनमोल वैश्विक संत!! या मानस आयुर्वेदाचार्याना शतशः नमन....

               तुझिया अपार प्रेमाचे ते फळ

                नाही तो अबल काय करी !!!

 

  संदर्भ-  मानस आयुर्वेद,   साधु बोध,.  


संकलन,

                    वैद्य वृंदावन

 कु. राधिका शरदराव मोहोड

   मोबा. ७९७२८६३८२२


Saturday, June 13, 2020

गीताप्रवचने



Download

वरील ग्रंथ FLIP HTML5 मध्ये उघडण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

अभंग चिंतन




 अभंग गाथा - चिंतन 

 

अनुवाद – डॉ. कृ. मा. घटाटे

वरील ग्रंथ FLIP HTML5 मध्ये उघडण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

 

साधुबोध







वरील ग्रंथ FLIP HTML5 मध्ये उघडण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Madhan Book

माधान 
लेखक - सी. डी. दाते 

सदरचे पुस्तक हे अध्यात्मिक नसून Economic Survey and Planning शी संबंधित आहे. 




पत्र - 1

श्री गुलाबराव महाराज यांचे पत्र १९१२ चे माहिती करता. 
सौजन्य - श्री मदनराव जोशी हस्ते श्री जी. डब्ल्यू. आंदनकर 


Tuesday, June 9, 2020

श्री विश्र्वेश्र्वर संस्थान माधान

श्री विश्र्वेश्र्वर संस्थान, माधान
श्री संत गुलाबराव महाराज यांचे ध्यान केंद्र
श्री क्षेत्र माधान येथील पुरातण शिव मंदीराचे जिर्णोध्दार जलद गतीने चालू आहे. श्री महाराजांच्या निस्सिम भक्तांनी या कार्याकरीता सढळ हाताने मदत करावी.
संपर्क- शरद मोहोड - 9028040222, नरेंद्र मोहोड - 9423609531

          

Thursday, June 4, 2020